Khamgaon Urban Cooperative Bank
Menu
  • Home
  • बँकेची माहिती
      • संचालक मंडळ
      • बँकेच्या शाखा
      • यशोगाथा
  • व्याज दर
      • ठेवीं वरील व्याज दर
      • कर्ज योजना
      • EMI Calculator
  • फोटो गॅलरी
  • फॉर्म
      • अकाऊंट स्टेटमेंट फॉर्म
      • तक्रार नोंदणी फॉर्म
      • तक्रार नोंदणी ( इलेक्ट्रॉनिक बँक ट्रान्झॅक्शन )
  • संपर्क
  • करियर
      • भरती प्रक्रिया २०१८
      • भरती प्रक्रिया २०१८ निकाल
      • भरती प्रक्रिया २०२०
  • IT Requirements

दि खामगांव अर्बन को - ऑप. बॅँक

स्थापना : श्रमस्य प्रतिष्ठा करौ च बलम् या ब्रिदासह खामगांव अर्बन को - ऑप. बॅँकेची स्थापना - 4 आक्टोंबर 1963 विजयादशमीचे मुहुर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन प्रचारक स्व. वसंतराव कसबेकर यांनी केली़. बॅँकेचे संस्थापक अध्यक्ष डॉ़. मा. गो. सावजी होते़.  केवळ रु़. 25,000/- चे भाग भांडवलावर समाजातील दुर्बल तसेच उपेक्षीत आणि मध्यम वर्गीय पांढरपेशा समाजाच्या आर्थिक उत्थानासाठी रा़. स्व़. संघाच्या मुशीत तयार झालेल्या कार्यकर्त्यांनी ही बॅँक सुरु केली़.  सन 1963 मध्ये लावलेल्या या इवल्याश्या रोपट्याचा विशाल वटवृक्ष झाला असून, सभासद संख्या 95000 चे वर आहे़ बॅँकेने सन 2013 मध्ये सुवर्ण  महोत्सवी वर्ष साजरे केले आहे़.  खामगांव सारख्या तालुका स्तरावर स्थापन झालेल्या व बहुतांश शाखा ग्रामिण भागात असलेल्या या बॅँकेने शेडयूल्ड बॅँकेचा दर्जा दि़ 22/05/1999 रोजी व मल्टीस्टेट बॅँकेचा दर्जा दि़ 12/07/2000 रोजी मिळवून देशपातळीवर सहकार क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे़.  बॅँकेने आर्थिक प्रगती सोबतच सामाजीक क्षेत्रातही मोठे काम करुन सहकाराच्या तत्वाचे सुरुवाती पासूनच पालन केले आहे़.

सामाजीक बांधीलकी  :

       केवळ नफा कमाविणे हा उद्देश न ठेवता बॅँकेने सामाजीक बांधीलकी जोपासत सामाजीक क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे़.  भुकप ग्रस्त, पुर ग्रस्त, अवर्षण अशा नैसगीक आपत्ती मध्ये नेहमी बॅँक पिडीतांच्या पाठीशी समर्थपणे उभी राहीली़.  कारगील युध्दातील शहीदांचे वारसांना मदत केली़ तसेच आदिवासी क्षेत्रात सुध्दा वनवासी बांधवांच्या शैक्षणिक व आरोग्यविषयक गरजांसाठी बॅँकेने वेळोवेळी मदत केली आहे़.  दिव्यांग बांधवांसाठी विविध शिबीरे आयोजीत करुन तपासणी, औषधोपचार, शस्त्रक्रिया इत्यादी प्रकारची मोठी आर्थिक मदत केली आहे.  समाजात चांगले क्रिडापटू निर्माण व्हावे म्हणून विविध खुल्या क्रिडा स्पर्धांना प्रोत्साहन, शेतकरी बांधवांना अल्पदरात कर्ज वाटप, विविध समाजातील धार्मिक कार्यक्रमात मदत, श्रीगणेश विर्सजनाचे वेळी सर्व गणेश भक्तांना चहापान मोफत, शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देणे़,  भारत सरकारचे आवाहनानुसार बेटी बचाव, स्वच्छता अभीयान, रक्तदान शिबीर अशा कार्यात बॅँक सदैव सक्रिय असून, सभासदांना बॅग्स्, निशुल्क दिनदर्शिका वितरण अशा अनेक कार्यक्रमात  सक्रिय सहभाग घेवून बॅँकेने आपली समाजातील बांधीलकी जोपासली आहे.  

मनुष्यबळ विकास :

       आधुनिक काळातील वाढत्या स्पर्धेच्या युगात बॅँकेने ग्राहक सेवेला अत्यंत महत्व दिले आहे.  बॅँकींग व्यवसाय हा बहुमागी व विविध क्षेत्रांशी निगडित असा असल्याने बॅँकींग व्यवसाय वृध्दिसाठी प्रशिक्षण वर्गाद्वारे कर्मचार्यांचे बॅँकींग क्षेत्रातील महत्वांच्या जे.ए.आय.आय.बी, सी.ए.आय.आय.बी परीक्षा, तसेच कर्मचार्यांचे विविध क्षेत्रातील बौध्दीक ज्ञान कौशल्य, क्षमता विकास, नेतृत्व विकास, व्यक्तीमत्व विकास, कायदे विषयक ज्ञान व सुप्त गुण यांच्या विकासासाठी आवश्यक ती संसाधने उपलब्ध करुन देणे हेच बॅँकींग व्यवसायातील मनुष्यबळ विकासाचे मुख्य सुत्र असून, अशा प्रकारचे कर्मचार्यांना प्रशिक्षण देवून प्रशिक्षीत केले आहे़ आणि आवश्यक पदांवर बॅँकींग क्षेत्रातील तज्ञ व्यक्तीची नव नियुक्ती करुन व्यावसायीक धोरण अवलंबले आहे व आर्थिक प्रगती साध्य केली आहे.

बॅँकेच्या प्रगतीची ठळक वैशिष्टे :  

  • बॅँकेस 22 मे 1999 रोजी मल्टीस्टेट शेडयूल्ड दर्जा प्राप्त झाला.
  • 12 जुलै 2000 रोजी शेडयूल्ड बॅँकेचा दर्जा प्राप्त झाला.
  • बर्हाणपूर (मध्य प्रदेश) येथे शाखा स्थापन.
  • व्यवसाय वाढीच्या दृष्टीने मार्केट एरीयामध्ये बॅँकेच्या शाखांचे स्थानांतरण केले.
  • नविन संचालक मंडळाची निवड :- ०६/०१/२०१९, मा. श्री. आशिष वि. चौबिसा, बॅँकेचे नववे अध्यक्ष म्हणून निवड.
  • सलग 3 वर्षे ऑडीट वर्ग अ.
  • कोअर बॅँकींग प्रोजेक्ट पुर्ण.
  • ए. टी. एम. सेवा उपलब्ध
  • नेट बॅँकींग, मोबाईल बॅँकींग सेवा देण्याचे दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत़.
  • Prev
  • Home /
  • About

© 2023 Khamgaon Urban Cooperative Bank. TPL_RESERVED

  • About
  • Privacy Policy
  • Contact
TPL_SCROLL